Monday, August 2, 2010

साबरमतीचा संत



एक आटपाट नगर होते. त्यात एक अती प्रेमळ व निष्ठावंत दहशतवादी राहत होता. अर्थात प्रेमळ व निष्ठावंत कारण दहशतवादावर त्याचे खूप प्रेम होते आणि विध्वंस माजवणे हेच त्याचे ध्येय होते. त्याची महिमा नक्कीच अपार असणार. कारण मध्य प्रदेशसह अनेक राज्यांत पोलीस त्याच्या शोधात होते. एवढी महान कीर्ती असतानाही सरकार त्याला किरकोळ गुन्हेगार म्हणून त्याचा सतत अपमान करी. दहशतवादी म्हटले की, गोळीबार, स्फोट, मारामार्‍या, चकमकी आल्याच. त्याच्या गुन्ह्यांमध्ये त्याला साथ देणार्‍या त्याच्या पत्नीचा व त्याचा खेळ संपला. दोघेही पोलिसांच्या हाती ठार झाले. खरे सांगायचे तर एक दहशतवादी मेला हे चांगले की वाईट यावर विचार करावासा वाटतो. कारण मलेरियाचा डास मारणे म्हणजे जीवहत्या समजली जाणार असेल तर कमालच आहे. ते आटपाट नगर म्हणजे हिंदुस्थानातील प्रगतीचे प्रतीक गुजरात आणि तो प्रेमळ दहशतवादी म्हणजे सरकारचा किरकोळ गुन्हेगार सोहराबुद्दीन. या संपूर्ण चकमकीचे खापर आज अमित शहा यांच्यावर फोडले गेले आहे. सोहराबुद्दीन-कौसरबी एन्काऊंटरचा सूत्रधार समजल्या जाणार्‍या शहांबद्दल लोकांना फार जास्त माहिती नाही. गलिच्छ, पान चावणार्‍या, साहेब साहेब कोकलत चमचेगिरी करणारा किंवा टीव्हीवर स्वत:ला प्रसिद्धी मिळवून घेणार्‍या फुकट्या आणि अनाडी नेत्यांसारखे नाहीत ते. अमित शहा हे बायोकेमिस्ट्री या विषयाचे पदवीधर. कॉलेजमध्ये असल्यापासून शहांचे राजकारणाबद्दलचे कुतूहल दिसून येई. गांधीनगर येथे श्रीमंत घरात जन्माला आलेले शहा यांचे पोट भरलेले होते व राजकारण ही गरज नसून आवड व स्वप्न होते. अहमदाबादमधील सी. यू. शहा कॉलेजमधून त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सदस्यत्व स्वीकारले. कॉलेजमधील निवडणूक जरी ते हरले तरी 1995 मध्ये यतीन ओझा यांचा पोल मॅनेजर म्हणून त्यांनी काम केले. साबरमती विधानसभेच्या 1995 च्या निवडणुकीत ओझांनी कॉंग्रेसच्या नरहरी अमीन या धट्ट्याकट्ट्या उमेदवाराला हरवले. म्हणून शहा यांचा राजकारणाचा अभ्यास दिसून आला. भारतीय जनता पार्टीच्या रा्रीय परिषदेत अमित शहांचे नाव खूप गाजले. वडोदर्‍याला झालेल्या या परिषदेच्या वेळी केशूभाई पटेल मुख्यमंत्री होते. नव्वदीतल्या त्या काळात शहा हे मोठे नाव होऊ लागले. 1997 च्या निवडणुकीत सरखेज मतदारसंघांतून शहा जिंकले. 2002 मध्येदेखील त्यांनी ही जागा जिंकली. विधानसभेच्या 182 जागांमधून 126 जागा मिळवून कॉंग्रेसला नाकीनऊ आणण्यात शहांनी मोदींना खूपच मदत केली. 1.58 लाखांच्या फरकाने जिंकून आलेले अमित अनिलचंद्र शहा यांना गोवर्धन झडीकया यांची जागा देऊन गृहमंत्री करण्यात आले. बँकांवर असलेला कॉंग्रेसचा दबदबा शहांनी कमी केला व क्रिकेट असोसिएशनही आपल्याच हाती असावे या दिशेने काम सुरू केले. गुजरात क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष मोदी झाले ही शहांचीच दूरदृी. 2007 मध्ये 2.35 लाख मतांच्या आघाडीने सरखेजची निवडणूक जिंकून शहांनी या क्षेत्रातील आपला आवाका सिद्ध केला. गुजरात म्हणजे विकासाची कार्यशाळा समजले जाते. हे राज्य आपोआप प्रगतशील झाले नाही. नेते व जनता यांच्या एकजुटीनेच आज या राज्याला उत्कर्षाचे दिवस दिसत आहेत, पण या जगाचा नियम आहे. कुणी पुढे जायला लागले की, त्याचे पाय खेचले जातात. गरीबाला गरीबच ठेवा ही कॉंग्रेसची युक्ती मोडून आणणार्‍यांची भरभराट सरकारला पाहवली नाही. या पुढे जाणार्‍या राज्याला थांबविण्याचा सोपा उपाय म्हणजे आक्रमण. मोदींच्या नेतृत्वाखाली गुजरात लखलखताना दिसल्यामुळे त्यांचे हात कापण्याचा प्रयत्न म्हणजेच अमित शहा यांची सीबीआय इन्क्वायरी. सोहराबुद्दीनच्या भावाने रुबाबुद्दीनने सर्वोच्च न्यायालयात केलेल्या अर्जाने आज एका दहशतवाद्यासाठी एका गृहमंत्र्याला तुरुंगात जावे लागले. सोहराबुद्दीन कुणी संत असता तर गो वेगळी असती, पण ज्याच्या घरात 40 एके-47 रायफली, 100 हॅण्डग्रेनेडस् आणि मोठ्या प्रमाणात दारूगोळा सापडतो त्याच्यासाठी तुम्ही काय काय करणार? शहांना दोन तासांची मुदत देऊन पोहोचता न आल्यामुळे ते इन्क्वायरीत साथ देत नाहीत असे मीडियाला कळवणे म्हणजे रचलेले नाटकच वाटते. काही तासांत 30 हजार पानांची चार्जशीट सीबीआयने दाखल करणे हेही काही शक्य असे वाटत नाही. काही गोींना वर्षे लागतात, पण नको तिथे दिसणारा सीबीआयचा वेग विचार करायला लावतो. सामान्य माणसाला राजकारण समजते, पण कॉंग्रेसचे पोरखेळ समजायला फारच डोके लढवावे लागेल. महागाईच्या भुताने पछाडलेल्या जनतेला जिथे दोन वेळा जेवायचे वांधे झाले आहेत त्याच देशात एका आतंकवादी संघटनेच्या सदस्यांसाठी होणारी बोंबाबोंब पाहून जीव तुटतो, पण कोण काय करणार! अमित शहांनी गुजरातसाठी जे केले ते कुणीही विसरणार नाही. दिल्ली व सीबीआयचे मत किंवा ध्येय काहीही असो, जनतेचा पाठिंबा अजूनही शहांबरोबरच आहे. मुंबईत झालेल्या हल्ल्यात कामटे, साळसकर, करकरे, ओंबळे मारले गेले. त्यांना मारणारे असे अनेक अजूनही फिरत आहेत. त्यांचे काय करायचे आता? दुर्दैव असे की, जेवढे आतंकवादी आहेत तेवढेच त्यांच्या मानवाधिकारांसाठी लढणारे वेडे आहेत, पण यांना कोण समजावणार की मानवाधिकार माणसांसाठी असतात, राक्षसांसाठी नसतात. असे कधी घडू नये, पण परत मुंबईत ‘26/11’ सारखा हल्ला झाला किंवा देशात कुठेही कसाबसारखा ‘कसाई’ आढळला तर कोणताही पोलीस अधिकारी त्याला मारण्याची हिंमत करणार नाही. अमित शहांनी काय केले ते स्वत:च सिद्ध करतील, पण राज्याच्या गृहमंत्र्याला एखाद्या दहशतवाद्याला मारण्याचे आदेश देण्याचीही सोय नसेल तर मग राज्य कसे चालायचे! शहांवर केलेला 30 हजार पानांचा सीबीआय रिपोर्ट रद्दीत विकला तर एक गरीब तरी निदान सुखाने दोन वेळचे खाऊ शकेल. महागाईवरून लक्ष काढण्यासाठी आपलाच पैसा नसत्या कामात जातोय. निष्कर्ष एवढाच, आपण भरलेला कर, देशाची संपत्ती, दहशतवाद्यांच्या मानवाधिकारांसाठीच संपणार. आपण कसाबसाठी वर्ल्ड बँकेकडून कर्जही काढू. तिस्ता सेटलवाडना हे नक्कीच आवडेल.
या ‘आठवड्याचा माणूस’ भाग्यवान आहे. महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल आणि लोकमान्य टिळक यांनी ज्या तुरुंगात स्वातंत्र्याच्या लढ्यात तुरुंगवास भोगला त्याच साबरमतीच्या ऐेतिहासिक तुरुंगात अमित शहांना सीबीआयने ठेवले आहे. सरदार पटेल यांचे नाव दिलेल्या सरदार बॅरेकमध्ये शहांनी 14 दिवस काढल्यावर सरदार पटेलांचे गुण त्यांच्यात अजून ठळक दिसतील. या तुरुंगाने मोठमोठ्यांना अजून मोठे केले. याच तुरुंगात सामान्य माणसांचे संतमहात्मेही झाले. हा तुरुंगच शहांना धीर देईल. खोटेपणा व दहशतवादाचा पराभव व्हावा आणि 14 दिवसांनी सत्याच्या जोरावर साबरमतीचा अजून एक संत बाहेर पडावा.

No comments:

Post a Comment