Saturday, August 7, 2010

रेखा नसलेला अमिताभ





1987 मध्ये रमेश देव यांच्या शेजारी बसून ‘सर्जा’ हा चित्रपट पाहिलेला मला आठवतो. अजिंक्यचा अभिनय व त्याच्या अभिनयाने भाळलेल्या प्रेक्षकांची प्रतिक्रिया पाहून त्यांच्या भावना उचंबळून आल्या होत्या. उंच, देखणा आणि उत्तम अभिनय गुण यांचा संयोग म्हणजेच अजिंक्य, असे सर्वांना वाटत होते. ‘हिंदीतल्या हीरोंसारखाच आहे आपला हा मराठीतला हीरो’ असेदेखील माझ्या कानावर पडत राहिले. 1989 मधील सलमानची चित्रपटसृीतील एण्ट्री ही ‘मैने प्यार किया’मध्ये गाजली. तेव्हा अजिंक्य आणि सलमानची तुलनादेखील झालेली मी विसरणार नाही. सलमान टिकला पण अजिंक्य गायबच झाला. सर्जा, अर्धांगी, शाब्बास सूनबाई, कशासाठी प्रेमासाठी या चित्रपटांनंतर अजिंक्य अमेरिकेला गेला. नेब्रास्का लिंकन युनिर्व्हसिटीत पुढील शिक्षण संपवून परतण्याचा त्याचा बेत होता. बी.एस.सी.नंतरचे शिक्षण घेऊन परदेशातून परत आल्यावर त्याला खूप फरक जाणवला. सिनेमा जगताला वाटले अजिंक्य आता परतणारच नाही.

‘जग कुणासाठी थांबत नाही हे मला तेव्हा कळले,’ असे अजिंक्य आजही सांगतो. मोठ्या कलाकाराचा मुलगा म्हणजे त्याला कसला त्रास असा सामान्य जनतेचा समज असतो, पण तसे नसते. वटवृक्षाखाली इतर झाडं वाढू शकत नाहीत. मोठ्या कलाकारांच्या मुलांची तुलना सतत त्यांच्या आई-वडिलांशी केली जाते. आई-वडिलांवर ज्यांचा रोष असतो तोही मुलांवर काढला जातो. तसेच काहीतरी अजिंक्यबरोबरही झाले. सर्जाने त्याला खूप मोठे केले, पण तो मराठी पडद्यासाठी मोठा आणि हिंदी पडद्यासाठी छोटा म्हणून नेहमीच वगळला गेला. कार्यक्षमता असूनही बाप मोठा की मुलगा मोठा या तराजूत तोलून त्याचा भाव लावला गेला. स्वत:ची प्रॉडक्शन कंपनी आहे म्हणून तो दुसर्‍यांकडे काम नाही करणार हा गैरसमज बाळगून त्याला विचारायलाही लोक संकोच करत. मी अजिंक्यला म्हटले, ‘‘तुझा साधेपणा आणि चांगलेपणाच तुला नडला.’’ आणि याच साधेपणाने त्याने हे मान्यही केले. उगाच कुणाशी भेटीगाठी नाही, चमचेगिरी नाही, रात्रीच्या पार्ट्या नाहीत म्हणून या सिनेमासृीशी दुरावलेला अजिंक्य मात्र आपल्या विश्‍वात खूपच आनंदी असतो. त्याच्या आयुष्याचा सर्वात मौल्यवान ठेवा म्हणजे त्याची पत्नी आरती व त्याची मुलं आर्य आणि तनया. त्यांच्याबद्दल बोलताना त्याचा चेहरा अगदी खुलून दिसतो. आर्य 18 वर्षांचा झाला आहे आणि अजिंक्यचा जवळचा मित्रही. दिनार आणि सतीश हे दोघे त्याचे खास दोस्त. चांगले-वाईट दिवस, सगळं काही भोगताना हे दोघे अजिंक्यसोबत उभे राहतात. या क्षेत्रात असल्याचे श्रेय तो त्याच्या शाळेतील तळपदे मॅडम यांनाही देतो. बी.पी.एम. शाळेतील त्याच्या शिक्षिकेने त्याला खूप प्रोत्साहन दिले.

बोलता बोलता अजिंक्यने एक किस्सा सांगितला. वांद्य्राच्या एका स्टुडिओमध्ये रंगलानी नावाच्या एका प्रोड्युसरची शूटिंग सुरू होती. दिग्दर्शकाला सांगून अजिंक्य दहा मिनिटे उशिरा पोहोचला. सर्वांच्या देखत रंगलानी यांनी अजिंक्यला खूप सुनावले. मराठी माणसं किती बेशिस्त व नालायक यावर चांगले भाषणच ठोकले. परवानगी घेऊनही हे सगळे ऐकायला लागले याचे खूप वाईट वाटले अजिंक्यला. पण त्याने एकही शब्द काढला नाही. मराठी माणूस सरळ आहे. साध्यासारखा वागतो व अन्याय सहन करण्याच्या सर्व सीमा पार करतो. इथेच त्याचे चुकते. हे बोलताना अजिंक्यतील ‘अँग्री यंग मॅन’ जागा झालेला मला लक्षात आला. स्वत:च्या मेहनतीचे पैसे मागायला लाजणारा खूप काही बोलून गेला या एका वाक्यात. अनेकांनी खडे, गंडे घालण्याचे सल्ले दिले. नाव बदलण्यासंदर्भात चर्चा केली, पण अजिंक्यने फक्त चांगले काम करण्यात विश्‍वास ठेवला. छोटे, सोपे बदल केलेही. पण ‘अजिंक्य कुमार’सारखे बदल त्याला कधी करावेसे वाटले नाहीत. मजेत तो म्हणतो, लोकांचं काही खरं नाही. ‘अजिंक्य खान’सुद्धा करायला सांगतील. माणूस म्हणून अजिंक्य अत्यंत यशस्वी आहे. रमेश देव प्रॉडक्शन ही कंपनी तो व त्याचा भाऊ अभिनय सांभाळतात. कोळसा व्यापारातही त्याची गुंतवणूक आहे. पण अभिनेता म्हणून खूप मोठे व्हायचे स्वप्न अजून पूर्ण नाही झाले असे तो म्हणतो. तणाव जाणवला की तो ‘जीम’मध्ये जाऊन कसरत करतो. त्यातून त्याला खूप शांतता मिळते. घरी बसून चित्रपट पाहणे ही त्याच्या आवडीची गो. वेळ मिळाला की ऊठसूट पुण्याला फेर्‍या मारणे हा त्याचा मला न समजणारा छंद. ‘मला पुणे खूप आवडते’ हे म्हणताना तो आताच निघेल पुण्याच्या दिशेने असे हावभाव असतात.

अजिंक्यचे नाव आई-वडिलांनी अगदी बरोबर ठेवले आहे. परिस्थिती अजिंक्यला हरवू शकणार नाही. त्याचे स्वप्न हेच त्याचे आयुष्य. वासुदेव बळवंत फडकेंसारखा उत्कृ मराठी सिनेमा काढणार्‍याने स्वप्न पाहातच राहावे हे माझे म्हणणे. कारण स्वप्नं त्याचीच पूर्ण होतात जो स्वप्न पाहण्याची हिंमत ठेवतो आणि ही हिंमत अजिंक्यकडे खूप आहे.
6 ऑगस्टला रिलीज झालेला त्याचा चित्रपट ‘जेता’ हा आयुष्याकडे पाहण्याचा त्याचाच दृकिोन आहे असे मला वाटते. प्रत्येकाला जिंकण्याचा अधिकार असतो आणि प्रत्येकात एक जेता असतो हे खरंच आहे. फक्त आपल्यातल्या जेत्याला जागे करावे लागते. अजिंक्य अमिताभचा फारच मोठा फॅन आहे. अमिताभसारखे होण्यासाठीच मी या क्षेत्रात आलो असे तो सांगतो. पण तसे झाले नाही याची त्याला खंत आहे. ‘अमिताभला’ ‘अमिताभ’ होण्यासाठी खूप काही सोसावे लागले. कंपनी बुडल्याचे दु:ख, कुलीतील अपघात, कर्जाचे ओझे, अपमान हे सर्व काही झेलूनच आज तो अभिनयाचा राजा झालाय. माझे आयुष्य सुखाचे गेले. आई-वडिलांचे प्रेम व आधाराने तसे सर्व काही हवे तसेच घडले. कधी हात पसरावे लागले नाहीत की मान खाली घालावी लागली नाही. म्हणूनच एखाद्वेळी अमिताभ झालो नाही हेच त्याचे पृथक्करण. पण माझे मत वेगळे आहे. नशिबाची रेखा ठळक असणे फार महत्त्वाचे असते. काच्या सोबत ही रेखाही गरजेची ठरते.

अजिंक्य हा खरोखरच अमिताभ होण्याचे सामर्थ्य ठेवतो. त्याचे दिसणे, वागणे, अभिनय कुठेही कमी पडत नाही. फक्त नशिबाच्या रेखेची सध्या साथ नाही एवढेच. पण हा ठळक रेखा नसलेला अमिताभ जरी ‘अमिताभ’ नाही होऊ शकला तरी काय. तो ‘अजिंक्य’ आहे. तू अमिताभ होण्याचा प्रयत्न सोड, कारण ‘अजिंक्य’वर लोकांचे खूप प्रेम आहे आणि त्यातच तुझी खरी जीत आहे. अमिताभ हा एक विचार आहे आणि त्या विचारांचा सारांश म्हणजे तुझा ‘जेता’. सर्वांनी हा चित्रपट पाहावा व स्वत:तील जेत्याला जागे करावे ही माझी इच्छा. नशिबाची रेखा नकोच तुला. तुझे स्वप्न पुरे आहे तुझे ध्येय गाठण्यासाठी. अमिताभ कशाला व्हायचे.

तू ‘अजिंक्यच’ रहा!!

No comments:

Post a Comment